आरती साई बाबा
भक्ति संगीत
॥ आरती ॥
आरती साई बाबा, सौख्य दातार जीवा।
चरण रजातली, द्यावा दासां विसावा, भक्तां विसावा॥
आरती साई बाबा...
जाळुनिया आनंग, स्वस्वरूपी राहे दंग।
मुमुक्षू जनाव दावी, निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग॥
आरती साई बाबा...
जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव।
दाविसी दयाघना, ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव॥
आरती साई बाबा...
तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा।
अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा॥
आरती साई बाबा...
कलियुगी अवतारा, सगुण ब्रह्म सचरा।
अवतीर्ण झालासे, स्वामी दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा॥
आरती साई बाबा...
आठा दिवसा गुरुवारी, भक्त करिती वारी।
प्रभुपद पहावया, भवभय निवारी, भय निवारी॥
आरती साई बाबा...
माझा निजद्रव्य ठेवा, तव चरणरज सेवा।
मागाणे हेचि आता, तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा॥
आरती साई बाबा...
इच्छित दीन चातक, निर्मल तोय निजसुख।
पाजावे माधवा, सांभाळ आपुली भाक, आपुली भाक॥
आरती साई बाबा...
आरती साई बाबा, सौख्य दातार जीवा।
चरण रजातली, द्यावा दासां विसावा, भक्तां विसावा॥
॥ सबका मालिक एक ॥
॥ श्रद्धा और सबूरी ॥